जाब विचारायला आला अन् टोळक्याने मारले
नाशिक (प्रतिनिधी): संत कबीर नगर मध्ये सराईत गुन्हेगाराचा खुन केल्याचा प्रकार शनिवार दि. ८ रोजी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. रात्री उशिरा पर्यंत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अरुण बंडी (१७, रा. अंबड) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत कबीरनगर येथे कच्चा रस्त्यावर टोळके उभे असतांना त्यांच्यात वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. चार ते पाच संशयितांनी एकावर कोयता, चॉपरेन वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भररस्त्यातच खुनासारखी गंभीर घटना घडल्याने गंगापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होते. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने रात्रीच तपासाची चक्र वेगाने फिरवत हल्लेखोरांचे नावे निष्पन्न केले. रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरु होता. मयत हा अंबड येथील राहणारा असून त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंडी जाब विचारण्याकरीता संत कबीर नगरमध्ये आला होता. या वादात त्याचा टोळक्याने खून केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.
