केटीएचएमच्या मैदानावर मुक्त विद्यापीठातर्फे आजपासून केंद्रीय क्रीडा महोत्सव

नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव दि. २३ व २४ रोजी येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २३) सकाळी १० वाजता या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होईल. तर, गुरुवारी (दि. २४) दुपारी ४ वाजता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते बक्षीस वितरण होऊन क्रीडा महोत्सवाचा समारोप होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली आहे. या केंद्रीय क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ. अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. त्यात विद्यापीठाच्या नाशिकसह, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे या आठही विभागीय केंद्रांतील जवळपास ४५८ खेळाडू सहभागी होणार आहेत. यातून निवड झालेले विद्यार्थी दि. १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात होणा-या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!