अजित पवार गटाकडून सात विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात!

येवला : छगन भुजबळ, दिंडोरी : नरहरी झिरवाळ, सिन्नर : माणिकराव कोकाटे, निफाड : दिलीप बनकर, कळवण : नितीन पवार, देवळाली : सरोज अहिरे, त्र्यंबक-इगतपुरी : हिरामण खोसकर

नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय जनात पक्षाने रविवारी (दि. २०) राज्यातील ९९ जागांवरील उमेदवार जाहीर केल्यानंतर सोमवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेसने देखील काही उमेदवार जाहीर केले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान सर्व आमदारांना पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील सात उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे.

येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, निफाडमधून दिलीप बनकर, कळवणमधून नितीन पवार, देवळालीतून सरोज अहिरे तर त्र्यंबक-इगतपुरीतून हिरामण खोसकर यांचा समावेश आहे.

इगतपुरी -त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार हिरामण खोसकर यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला असून, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच भाजपमधून अजित पवार गटात गेलेले भरत गावित यांना नवापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!