इगतपुरी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी योजना या महाराष्ट्र राज्याला समृद्ध बनवत असून पुढील पाच वर्ष आपल्या राज्याला दिशादर्शक नेतृत्व बघायचे आहे. त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून मतदार संघ सुजलाम् सुफलाम करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. घोटी येथे शिवसेनेची बैठक झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तालुकाध्यक्ष संपतराव उपस्थित होते. संपतराव काळे यांनी बोलतांना सांगितले की, महाराष्ट्रातील इतर मतदार संघापेक्षा आपल्या मतदार संघात शिवसेनेचे सर्वात जास्त प्राबल्य आहे. संपूर्ण मतदार संघात गाव तेथे शिवसेनीची शाखा आहे. म्हणून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात शिवसेनाचा मोठा वाटा असणार आहे.
दरम्यान यावेळी सेनेचे जिल्हा उपप्रमुख रघुनाथ तोकडे हे म्हणाले की तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वसात घेऊन कामे केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बघायचे असेल तर युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी व शेवटच्या कार्यकर्त्यांनी आजच कामाला लागले पाहिजे. आणि आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठीशी राहून काम केले पाहिजे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत काळे यांनी मनोगत व्यक्त करून आमदार हिरामन खोसकर यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, लोकसभा समन्वयक गणेश कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पुजा धुमाळ, उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे, लाडकी बहिण योजनेचे तालुकाध्यक्ष संपतराव काळे, बाळासाहेब गव्हाणे, भास्कर आहेर, समन्वयक पंडित कातोरे, दत्तू रूमने, पुंडलिक जमधडे, विश्वास खातळे, सीमा गायकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.