घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भव्य दिव्य जाहीर सभा होणार आहे गेल्या महिन्यापूर्वीच त्र्यंबकेश्वर येथे अजित दादा पवार यांची एक सभा झाली असून इगतपुरी तालुक्यातील त्यांची दुसरी सभा होणार आहे तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी येथे ही सभा होणार असून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांचे सुपुत्र वामन कुस्कर यांनी दिली आहे.
दरम्यान अजित दादा पवार यांची विजयी सभा असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ही विजयी सभा घेणार आहे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहे तसेच मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान तालुक्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहाण खोसकर यांनी केले आहे. इगतपुरी मतदारसंघांमध्ये आमदार हिरामण खोसकर यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असून आज होणारी सभा ही विजय सभा होणार असल्याचे मतदार संघातील सर्वसाधारण नागरिक सांगत आहे या विजयी सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे मार्गदर्शन करणार आहे.
फोटो – अजितदादा यांचा घ्या
