दिंडोरी-पेठ तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले कार्यसम्राट ना. झिरवाळ हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार: विलास कड

विलास कड यांनी व्यक्त केला निर्धार

नाशिक  (प्रतिनीधी): दिंडोरी-पेठ तालुक्याचा सर्वांगिण विकास हा एकमेव ध्यास घेतलेल्या ना. झिरवाळ यांनी सुमारे अडीच हजार कोटी इतका प्रचंड निधीची विकास कामे मंजुर करुन घेत बहुंताशी कामे ही पुर्ण केली आहे तर बरीच कामे ही प्रगतीपथावर असुन अशा प्रकारे मतदार संघाच्या विकासाचा दुरदृष्टीकोन असलेल्या ना. झिरवाळ यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडुन देईल असा विश्वास वणीचे उपसरपंच तथा माजी जि.प. सदस्य विलास कड यांनी व्यक्त केला आहे.

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विरुद्ध आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर यांच्यात सरळ लढत आहे. या निवडणुकीत ना. झिरवाळ व कार्यकर्ते केवळ मतदार संघाचा सर्वांगीण विकास ह्या मुद्द्यावर प्रचार करीत आहे. कुठल्याही प्रकारचे हेवेदावे न ठेवता ना. झिरवाळ यांनी विकासाचे राजकारण केले. यात दिंडोरी-पेठ तालुक्यात मोठ्या संख्येने एम आय टँक बांधण्यात आले, तसेच वीजेचा प्रश्न सोडवीण्यासाठी ठिकठिकाणी उपकेंद्रे तयार करुन वीजेचा दाब नियंत्रणात ठेवुन व्यावसायीकांसह, घरगुती व शेतकऱ्यांना योग्य दाबाने व अखंडीत वीज पुरवठा कसा होईल यासाठी ना. झिरवाळ यांनी ठोस पावले उचलली आहे. तसेच मांजरवाडा सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पासह इतर अन्य जलप्रकल्प तयार करुन अरबी समुद्रात वाहुन जाणाऱ्या पाण्याला योग्य वळण देत मतदार संघासह जिल्ह्याचा पाणी प्रश्न हा केवळ ना. झिरवाळ यांच्या दुरदृष्टीने सुटणार आहे. तसेच यातील काही पाणी हे स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचा ना. झिरवाळ यांचा मानस असुन, त्या राखीव पाण्याचा वापर करत मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्र ओलीताखाली येऊन शेती सुजलाम सुफलाम होईल व त्यामुळे बळीराजाचे जीवनमान उंचावण्यात मदत होणार आहे.
तसेच धरणांचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणवर साचलेला गाळ उपसण्याची संकल्पणा ना. झिरवाळ साहेबांनी मांडली असुन सदर गाळ उपसा झाल्यास धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवंत पाणी साठा वाढेेल याचा फायदा स्थानिकांना होणार आहे. याच प्रमाणे ना. झिरवाळ यांनी आरोग्य व शिक्षण ह्या संवेदनशिल विषयात हात घालत तळागाळा पर्यंत उत्तम आरोग्यसेवा कशी मिळेल यासाठी सुसज्ज यंत्रणा उभारण्यावर भर दिला. तसेच देशाचे भविष्य असलेल्या खेड्या-पाड्यावरील मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी देखील ना. झिरवाळ आग्रही राहीले आहे. याच प्रमाणे दळण-वळणाचे प्रभावी माध्यम असलेले मोठ्या गावांना जोडणारे खेड्यापाड्यांचे रस्ते तसेच पुल दर्जेदार बनवीण्यासाठी ना. झिरवाळ हे अग्रेसर आहेत. अशा प्रकारे सुमारे अडीच हजार कोटींच्या विकास कामांचा निधी मंजुर करुन पैकी बरीचशी कामे पुर्ण झाली आहे, काही कामे प्रगतीपथावर आहे. तसेच काही कामांचे लवकरच आदेश निघुन ती काम देखील मार्गी लागणार आहेत. त्या प्रमाणे तालुक्यातील सुमारे सव्वाशे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक चुना लावुन पसार झालेल्या एका महिला व्यापाऱ्यास अटक करुन कारवाई व्हावी यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करुन त्या यश मिळवण्यात देखील ना. झिरवाळ साहेबांची भूमिका महत्वाची ठरली आहे. अशा प्रकारे दिंडोरी पेठ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले सामान्यातील असामान्य नेतृत्व असलेल्या ना. नरहरी झिरवाळ साहेबांना येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, घड्याळ ह्या चिन्हा समोरील बटण दाबुन जनता मोठ्या मताधिक्याने पुन्हा विधानसभेत पाठवेेल. असा विश्वास वणीचे उपसरपंच तथा माजी जि.प. सदस्य विलास कड यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!