शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सुनिताताई चारोस्कर यांना विजयी करा
नाशिक (प्रतिनीधी): जिल्हा बँक संपवीण्याचा घाट घालणाऱ्या सरकारला घरचा रस्ता दाखवीण्यासाठी व शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवीणारा माणुस ह्या चिन्हा समोरील बटन दाबुन सुनिताताई चारोस्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन दिंडोरी कृ.ऊ.बा. चे सभापती प्रशांत कड यांनी केले आहे.
एका बाजुला कोरोना सारखी महामारी, गारपीट, अतीववृष्टी अशा नैसर्गिक आपत्यांमुळे उपजिवीका भागवीणे कठीण झालेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यातच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत असतांना सदर बँक अडचणीतुन बाहेर न काढता उलट ती संपवीण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. असा आरोप दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी केला असुन शेतकऱ्यांची अर्थवाहिनी संपवीण्याचा घाट घालणाऱ्या सरकारला घरचा रस्ता दाखवा असे आवाहन देखील प्रशांत कड यांनी केले आहे. तसेच नाशिक जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा असुन येथील शेतकरी जगला तर बाजारपेठा टिकाव धरु शकतील, शेती सुजलाम सुफलाम झाली तर औद्योगीक क्षेत्रात प्रगती दिसेल. म्हणुन शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेले देशाचे नेते शरद पवार साहेब, काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे व माकपाचे जिवा पांडू गावित साहेब व मित्रपक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा कादवा साखर कारखाण्याचे अध्यक्ष श्रीरामजी शेटे, शिवसेना उबाठा गटाचे नेते जयंत भाऊ दिंडे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील, माकपाचे नेते जिवा पांडू गावित, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, मविप्र संचालक प्रविण नाना जाधव, संजय आप्पा पडोळ, अॅड. विलास निरगुडे, कृऊबा उपसभापती योगेश बर्डे, नामदेवराव घडवजे, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख सतिश देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, श्याम हिरे, तौसिफ मणियार, राजेंद्र गोतरणे, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, नरेंद्र वड, सचिन बर्डे, बाळासाहेब घडवजे, सतिष जाधव, बब्बू शेख, बंटी सैय्यद, राहूल मोरे, विकी भवर, जगन वाघ, अमोल चोथवे आदींसह दिंडोरी पेठ तालुक्यातील संपुर्ण महा आघाडीचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी सुनिताताई चारोस्कर यांना विजयी करण्यासाठी निश्चय केला आहे.
तरी मतदारांनी देखील महा विकास आघाडीच्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनिताताई रामदास चारोस्कर यांच्या अनुक्रमांक २, तुतारी वाजवीणारा माणुस ह्या निशाणी समोरील बटण दाबुन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीेेचे सभापती प्रशांत कड यांनी केले आहे.
