नांदगाव (प्रतिनिधी): आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकाºयांची शनिवारी (दि. १५) संयुक्त बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष युतीमध्ये लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख सुनील जाधव, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे व भाजप व्यापारी आघाडीचे दत्तराज छाजेड, मंडल अध्यक्ष संजय सानप, उमेश उगले, राजीव धामणे, दीपक देसले, रेखाताई शेलार, सचिन पांडे, सतीश शिंदे उपस्थित होते.
जिल्हाभरात युतीच्या चर्चेचे गु-हाळ सुरू असताना शनिवारी (दि. १५) नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांनी महायुतीची अधिकृत घोषणा केली. जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी भाजप-सेना युतीची ही जिल्ह्यातील पहिली घोषणा ठरली आहे.
दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी उपस्थिती लावून युतीची घोषणा करताना येणा-या निवडणुकीत नांदगाव नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी युतीची ही पहिली अधिकृत घोषणा असल्याने याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे. आमदार कांदे यांची विकासाबाबतची दूरदृष्टी आणि नांदगावच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने आम्ही युतीचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
या युतीमुळे स्थानिक राजकारणात समीकरणे बदलणार असून विरोधकांवर दबाव वाढणार आहे. युती जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षांनी वॉर्डनिहाय चर्चा, उमेदवारांची छाननी, जनसंपर्क मोहिमेचे आराखडे, यांसह पुढील निवडणूक नियोजनाला सुरुवात केली आहे. युतीमुळे नांदगाव नगरपरिषद निवडणुक प्रचारात रंगत येणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
