मुकणे येथील गोवर्धने विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न!

  • मनोगत व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांना अश्रु अनावर 

  • एक आदर्श घडवत या समारंभचे आयोजन इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी केले

प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयातील १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभा उत्साहात पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करतांनाच विद्यार्थ्यांना झाले अश्रु अनावर झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व उपस्थितांनाही गहिवरून आले.
होऊ घातलेल्या १०वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जवळ आल्याने या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी थोरात हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील के.जी.मेहता हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य धनंजय पाठक, घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक राव, सुनील चोरडिया, किसन भोर, श्रीमती विजया पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी १० वीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा फुल व शाल देऊन सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आई, वडील व शिक्षकांची मान उंचावेल असे काम करून परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे तसेच पुढील शिक्षणासाठी आई वडिलांना विचारात घेऊन ध्येय निश्चित करावे असे आवाहन प्रमुख पाहुणे के.जी.मेहता हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य धनंजय पाठक यांनी केले. तर अनेक दाखले देत विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या बाबीं आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुकणे : विध्यार्थी निरोप समारंभात के.जी.मेहता कॉलेजचे प्राचार्य धनंजय पाठक यांचा सत्कार करतांना मुख्याध्यापक बाबासाहेब थोरात समवेत विष्णु पाटील राव, अशोक राव, माणिकराव देशमुख, एकनाथ नेहरकर आदींसह मान्यवर. (छाया : प्रभाकर आवारी)

१० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ करण्यासाठी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी केलेले आयोजन ही आगळी-वेगळी संकल्पना असल्याचेही प्राचार्य धनंजय पाठक यांनी सांगितले. मुख्याध्यापक बाबासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात घ्यावयाची काळजी व परिक्षेबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तर चैताली वेल्हाळ, संस्कृती जाधव, प्रांजल राव, गौरव राव, सिद्धार्थ राव आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांना व सर्व शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. संघराज उबाळे, पुष्कर राव, आर्यन आवारी, कार्तिकी धोंगडे, काजल धांडे, तेजस राव, हरीश बोराडे आदींसह विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास यावेळी शिक्षक माणिकराव देशमुख, राजाराम गायकर, किसन भोर, एकनाथ नेहरकर, रमेश खैरनार, श्रीमती विजया पाटील, प्रमिला निर्मळ, सुरेखा चव्हाण, रमेश गायकवाड, दिलीप पाटील, बाळु खातळे, गौरव डावरे, कुणाल शिंपी, अनिता आंबेकर आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिनिता चोरडिया व वैष्णवी गायकर या विद्यार्थिनींनी केले तर आभार रमेश खैरनार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!