गुरुवारी येवल्यात ‘आमदार केसरी’ बैलगाडा शर्यत!

नाशिक (प्रतिनिधी): श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आंबेगाव (ता. येवला) येथे गुरुवारी (दि. २०) ‘आमदार केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते होईल. माजी सरपंच आनंद गिते मित्रपरिवार, आंबेगाव यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदगावचे माजी आमदार संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. के. जगताप, लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, माजी उपसभापती गणेश डोमाडे, राजू बोरगुडे, आंबेगावच्या सरपंच अर्चना गिते, माजी सरपंच आनंदा गिते आदी उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा तीन फेºयांच्या ओपन मैदानावर होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एक हजार व मानाची ढाल, द्वितीय ७१ हजार व मानाची ढाल, तृतीय ५१ हजार व मानाची ढाल, चतुर्थ ३१ हजार व मानाची ढाल, पाचव्या क्रमांकास २१ हजार व मानाची ढाल, सहाव्या क्रमांकास १५ हजार व मानाची ढाल, सातव्या क्रमांक ११ हजार व मानाची ढाल असे बक्षीसांचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!