नाशिकरोड, जेलरोड, एकलहरे येथील वीज पुरवठ्यावर दोन दिवसांपासून परिणाम

एकलहरेसाठी नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू

नाशिक (प्रतिनिधी): मुसळधार पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने एकलहरे येथील विद्युत उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून दोन दिवसांपासून नाशिकरोड, जेलरोड व एकलहरे परिसरातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बंद आहे. यामुळे महावितरणकडून तातडीने उपाययोजना सुरू असून, मंगळवारी (दि. ११) महापारेषणचे एक पॉवर ट्रान्सफॉर्मर एकलहरे विद्युत उपकेंद्र येथे पोहचले असून ते कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महापारेषणच्या एकलहरे येथील २२०७३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातील ५०७३ (१५० एमव्हीए) क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बिघाडल्याने उपकेंद्रातून वीजपुरवठा होणारी नाशिकरोड भागातील महावितरणची उपकेंद्रे सोमवारी (दि. १०) पहाटे प्रभावित झाली. मात्र, या उपकेंद्रातील वीज भार व्यवस्थापन करून महावितरण पर्यायी स्त्रोतामधुन मागणीनुसार वीज पुरवठा करत आहे. एकाचवेळी झालेला बिघाड ही अनपेक्षित घटना असून, त्यामुळे पर्यायी इतर महापारेषणच्या व महावितरणच्या उपकेंद्रातून बॅक फिडींग करून वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भार व्यवस्थापन करून गरजेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करून उपकेंद्रातील वाहिन्यांना टप्याटप्याने वीज पुरवठा केला जात असल्याचे वीज महावितरणने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!