प्रवाशांना मारहाण करत होता चोरी; रेल्वे पोलिसांनी आवळल्या चोराच्या मुसक्या!

नाशिकरोड (प्रतिनिधी): गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीस अटक नाशिकरोड रेल्वे पोलिसांना यश फिर्यादी नामे विजय कांबळे हे दिनांक 05 डिसेंबर 24 रोजी राज्यराणी एक्सप्रेसने मुंबईकडे जात असताना आरोपी नामे अजय गच्चे रा. नांदेड व त्याच्या इतर साथीदारांनी गाडीमध्ये फिर्यादी व त्याच्या मित्राला मारहाण करून खैरवाडी रेल्वे स्टेशन येथे गाडी थांबल्यानंतर पळून गेले होते. त्याबाबत नाशिकरोड रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता. संशयीत आरोपी हा गेले तीन महिन्यापासून फरार होता. त्याला नाशिकरोड रेल्वे पोलिस स्टेशन चे API सचिन बनकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख ASI संतोष उफाडे पाटील, PC गणेश कांबळे यांनी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे नाशिकरोड येथे प्लॅट फॉर्म क्र. एकवर गाडीची वाट बघत थांबले असता अनोळखी इसमाने फिर्यादी यांची मोबाईल व 30 हजार रोख रक्कम असलेली बॅग नकळत चोरून नेली होती. त्याबाबत त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून नाशिक रोड RPF/GRP यांची संयुक्त टीम बनवून संशयित आरोपीतांबाबत गोपनीय मिळाल्याने त्यांचा शोध घेऊन संशयीत आरोपी आकाश शंकर अडंगले रा. जयभवानी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून 19700/- रू चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीस मा. न्यायालयाने 01 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

हि कामगिरी हे पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, मा. सूर्यकांत बांगर सर SDPO मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली API सचिन बनकर, RPF चे PI हर्फुल यादव, PSI खर्चे, PSI सोनवणे, तपास पथकाचे प्रमुख ASI संतोष उफाडे पाटील, HC शैलेश पाटील, PC गणेश कांबळे, आर पी एफ चे सागर वर्मा, मनीष कुमार यांच्या पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!