नाशिक (प्रतिनिधी): शहर व जिल्ह्यात पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता असून, आकाश पुढील पाच दिवस निरभ्र राहणार आहे. मात्र, मंगळवारी (दि. ११) जिल्ह्यातील घाट क्षेत्र वगळता काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस कमाल तापमान ३७-४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १४-१८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग दोन ते चार कि.मी. प्रतितास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
