वज्रकाय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने हनुमान जन्मोत्सव उत्साहात!

अंबड (प्रतिनीधी): डीजीपीनगर नं.2 येथील वज्रकाय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेत तीन दिवसांचा हनुमान जन्माेत्सव माेठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. वज्रकाय हनुमान मित्रमंडळ, एएसएमएम ग्रुप, सुरया उद्याेग समूह, मराठा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयाेजन करण्यात आले. यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत राेषणाई आणि सजावट करण्यात आली हाेती. यावेळी सुमारे दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या हनुमान जन्माेेत्सवा निमित्त गुरुवारी (दि.10) डिजीपी नं.2 परिसरातून बजरंग बलींचे मुकुट व पादुकांची महामिरवणूक काढण्यात आली. प्रख्यात असे श्री देवमामलेदार यांच्या ब्रास बॅण्डच्या तालावर, पताक्याची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीला सुरुवात झाली. परिसरातील शेकडाे भाविकांनी मिरवणुकीत सहभागी हाेत दर्शनाचा लाभ घेतला. या मिरवणुकीमध्ये महिलांनी व बालकांनी माेठ्या प्रमाणात सहभाग घेतला हाेता. शुक्रवारी (दि.11) कालीपुत्र कालिचरण महाराज यांचे प्रवचन झाले. शनिवारी (दि.12) सकाळी महाआरती, दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनासाठी आलाेट गर्दी दिसून आली. यानिमित्ताने समता ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये साधारणत: 50 भाविकांनी रक्तदान केले. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे 10 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचा दावा आयाेजकांनी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष भावेश (करण) शिंदे, उपाध्यक्ष कृष्ण (ओम) डाेन्नर, सचिव अंकूर पाटील, खजिनदार अमित घरटे, संताेष आडके, प्रशांत जाधव, मयूर भावसार, प्रशांत जाधव, निरज नाटकर, पाटील, आदित्य शिंदे, दीपक मराठे, महेश आगळे, केदार दीक्षित, मयुर दिक्षित, अभिषेक माहंत, सुरेश गुप्ता, केशव जारे, संदीप जाधव, श्रीकृष्ण महाजन, श्रीकांत लहामगे, प्रभाकर बच्छाव, आप्पाजी देसले, विशाल देशमुख, अमाेल भांबर, चेतन घरटे, ऋषीकेश डाेन्नर, सचिन निकम, युवराज पाटील, विकी नंदन, साेमवंशी काका, उमेश बच्छाव, भुषण बच्छाव, महाजन काका, खराेटे काका, आदीनी परिश्रम घेतले.

गेले 16 वर्षांपासून आम्ही वज्रकाय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने हनुमान जन्माेत्सव एकत्रित येत साजर करत आहाेत. गत वर्षाच्या तुलनेत भाविकांनी ह्या वर्षी जास्त संख्येने उपस्थिती लावून या तीन दिवसांच्या हनुमान जन्माेउत्सव साेहळ्याचा लाभ घेतला. यासाठी सर्वांचे मनपुर्वक आभार. तसेच भाविकांच्या गर्दीमुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना यापुढे सामाजिक व धार्मिक कामे करण्यासाठी एक नविन उर्जाच मिळाली.
– भावेश (करण) शिंदे, अध्यक्ष वज्रकाय हनुमान ट्रस्ट, डि.जी.पी. नं.2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!