महसूल कर्मचा-यांचा बुधवारपासून ‘कामबंद’चा इशारा!

नाशिक (प्रतिनिधी): महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय त्वरित लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांनी बुधवार (दि. १०) जुलै पासून चार टप्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
संपूर्ण राज्यातील महसूल कर्मचा-यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे. या संदर्भात महसूल कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कळवावे, अशी विनंती केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागासाठी एक परीक्षा पद्धती लागू करावी, अव्वल कारकून यांचे पदनाम सहायक महसूल अधिकारी करावे, यासह अनेक मान्यंबाबत निर्णय न झाल्यास १० जुलैपासून काळ्याफिती लावून काम करण्यात येईल. ११ जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने, १२ रोजी लेखनी बंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास १५ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष तुषार नागरे, राज्य अध्यक्ष जीवन आहेर, सल्लागार नरेंद्र जगताप, कार्याध्यक्ष रमेश मोरे, कोषाध्यक्ष अमोल हांडगे, संघटक योगेश नाईक, प्रकाश तावडे, रतिलाल सोनवणे, विनोद बागूल, आदित्य परदेशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!