सटाणा (प्रतिनिधी): येथील प्रगती शिक्षण संस्था संचालित प्रगती बालविकास, प्राथमिक व माध्यमिक विद्यालाय्च्या विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ मध्ये झालेल्या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत अतुलनीय यश संपादन केले. यात कु. स्वज विवेक पाटील याची खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावी च्या प्रवेशासाठी निवड झाली. त्याच बरोबर तो बागलाण तालुक्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांकाने तर जिल्ह्यात दहावा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती धारक झाला. तसेच कु. विश्वजित भरत भदाणे याचा तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती धारक ठरला. विद्यालयातील इयत्ता पाचवी मध्ये वैष्णवी राहुल शेलार, वेदिका बाबासाहेब इलग आयुर्षी किरण भामरे, वैदेही लक्ष्मण सोनवणे तर इयत्ता आठवी मध्ये कृष्णा बाबासाहेब इलग उत्तीर्ण झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्याध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.
प्रगती प्राथमिक विद्यामंदिर सटाणा विद्यालयाचे नवोदय व शिष्यावृत्त्ती परीक्षेत घवघवीत यश!
