महिलांनी विजवितरण कंपनीच्या कार्यालयाच्या दरवाजाला चिकटवले निवेदन!

वणी (प्रतिनिधी): येथील किर्ती नगर भागात एक दिवस विज पुरवठा बंद झाल्याने तसेच संपूर्ण रात्र अंधारात घालवावी लागल्याने संतप्त महिलांनी येथील अधिकारी कार्यालयात नसल्याने निवेदन दरवाज्यावर चिटकवत तिव्र शब्दात संताप व्यक्त केला. वणी येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात आल्या असता येथील कनिष्ठ अभियंता कार्यालयात नव्हते कार्यालय बंद होते. दि.७ जुलै २४ रोजी दुपारी दोन वाजेपासून या भागातील विज पुरवठा बंद पडला होता. विज पुरवठा बंद झाल्याने या भागातील नागरिकांचे हाल झाले.विजपुवठा बंद असल्याने पाण्याची अडचण झाली.महावितरण कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आल्याचे संबंधित महिलांनी सांगीतले. रात्री विज पुरवठा चालु होणारच नाही असे सांगितल्याने सकाळी अनेक महिला आक्रमक होत कार्यालयात आल्या होत्या. त्यानी विजे संदर्भात समस्याचा पाढा वाचला.अनेक दिवसांपासून या भागात विजेची लपंडाव सुरू होता. अधिकचा प्रवाह वाढल्याने अनेकांची विजेवरील उपकरणे जळाली आहे.विजेच्या कमी जास्तीचा दाबाने मागील अनेक दिवसांपासून लोक त्रस्त आहे.तसेच दि. ७ जुलै रोजी दुपारी या भागातील डिपी जळाली तेव्हा पासून विज पुरवठा बंद होता.महावितरण कंपणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता डीपी दि.८जुलै रोजी दुपार पर्यंत बसवली जाईल असे सांगण्यात आले. अनेक दिवसांपासून या डिपीत वारंवार तांत्रिक बिघाड होत होता ती जळाल्याने या ठिकाणी नविन डीपी बसविण्यात आली असुन विज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे कनिष्ठ अभियंता मुळकर यांनी सांगीतले. संबंधित महिलांना समजावून सांगत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अधिका-यांनी केला. यावळी वैशाली मराठे रूपाली कासारे श्वेता दुसाने सरिता जाधव वैशाली पवार गीता चव्हाण तसेच अनेक महिला होत्या.

किर्ती नगर येथील डीपी जळाल्याने दि.७ जुलै दुपार पासुन विज पुरवठा बंद होता.या ठिकाणी नविन डीपी बसवुन विज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.मध्यंतरी विजेचा दाब कमी जास्त होत असल्याने विज ग्राहक त्रस्त होतो डिपी बदलल्याने ह्या समस्या दुर होतील.
मुळकर, कनिष्ठ अभियंता
विज महावितरण कंपणी

अनेक दिवसांपासून आमच्या परिसरात विजेच्या अडचणी वाढल्या होत्या विजेचा दाब वाढल्याने अनेकांची विजेची उपकरणे जळाली.विजपुरवठा खंडीत झाल्या नंतर विज वितरण कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने सकाळी आम्हि महिला निवेदन देण्यासाठी कार्यालयात आल्या होत्या येथे कोणीच आलेले नव्हते आम्ही आमचे निवेदन दरवाज्यावर चिटकवले.
वैशाली मराठे, किर्ती नगर, वणी

दुपारी विज पुरवठा बंद झाला विज वितरण कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता विज पुरवठा लगेच सुरू होणार नाही वेळ लागेल उद्याकडे चालु होईल.असे सांगण्यात आले रात्रभर विज नसल्याने खुप त्रास झाला लहान मुलांना डासांचा त्रास झाला.तसेच अनेकांना रात्र जागून काढावी लागली
रूपाली कासारे, किर्ती नगर, वणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!