नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस दलात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत रविवारी बोलावण्यात आलेल्या ५४ उमेदवारांपैकी ४९ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. यामध्ये २ महिला, २ तृतीयपंथी, २ माजी सैनिकांचा समावेश आहे. यापैकी ५ उमेदवार उंची मध्ये अपात्र ठरले. भरती प्रक्रियेत काही कारणास्तव उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, माजी सैनिक हजेरीपट, शारीरीक मोजमाप, व मैदानी चाचणी करीता उपस्थित होते. दिवसभरात ४९ उमेदवारांची चाचणी पूर्ण करण्यात आली. चाचणीमध्ये एकाही उमेदवाराला दुखापत झाली नाही. मैदानावर चाचणीकरिता उपस्थित उमेदवाराला परीक्षकांनी सूचना दिल्या. कुठलाही त्रास होत असल्यास चाचणी न देण्याचा सल्ला दिला जात असून अशा उमेदवारांना पुन्हा संधी दिली जात आहे.
Related Posts
मनपा भरती आता टीसीएसमार्फतच होणार; वैद्यकीय, अग्निशमन विभाग ६२४ जागा
नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाने सर्वच शासकीय आस्थापनांवरील रिक्त पदांच्या जागा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले…
पुनद योजनेच्या भरवशावर न राहता गिरणा नदीच्या जुण्या योजनेला पर्यायी व्यवस्था ठेवा : अरविंद सोनवणे
तुषार रौंदळ, सटाणा : आठवड्या भरापासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.…
तोतया पोलिसांनी मदतीचा बहाणा करून महिलेचे दागिने लांबविले!
नाशिक (प्रतिनिधी): पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविल्याचा प्रकार राजीवनगर भागात घडला. या घटनेत मदतीचा बहाणा…
