मनपा भरती आता टीसीएसमार्फतच होणार; वैद्यकीय, अग्निशमन विभाग ६२४ जागा

नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाने सर्वच शासकीय आस्थापनांवरील रिक्त पदांच्या जागा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी नाशिक महापालिकेने भरतीसंदर्भात टीसीएस कंपनीबरोबर २०२५ पर्यंतचा करार केलेला असल्याने राज्य शासनाने यापूर्वी भरतीकरता परवानगी दिलेल्या वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील जवळपास ६२४ इतकी पदांची भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत केली जाणार आहे.
नाशिक महापालिकेचा पहिला आकृ तीबंध १९९३ मध्ये मंजूर करण्यात आला. तेव्हापासून महापालिकेत नोकर भरती झालेली नाही. २००२ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मानधनावर काम करणाºया जवळपास बाराशे कर्मचाºयांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्यात आले. महापालिकेच्या पहिल्या आकृतीबंधामध्ये ७०९० पदे मंजूर आहेत. यापैकी आजमितीस स्वेच्छानिवृत्ती, सेवानिवृत्ती तसेच काही कर्मचारी मयत झाल्यामुळे जवळपास सव्वा दोन हजार पदे सध्या रिक्त आहेत. नाशिक महापालिकेचा समावेश ब वर्ग महापालिका श्रेणीत झालेला आहे. त्याअनुषंगाने नाशिक मनपा प्रशासनाने २०१७ मध्ये जवळपास १४ हजार ९४४ पदांचा आकृ तीबंध शासनाला सादर केला होता. मात्र हा आकृतीबंध व्यवहार्य नसल्याने तसेच अनेक त्रृटी असल्याने राज्य शासनाने सुधारीत आकृ तीबंध सादर करण्याचे आदेश मनपाला दिले होते. त्यानुसार मनपाच्या प्रशासन विभागाने मार्च २०२४ मध्ये ९०१६ पदांचा सुधारित आकृतीबंध महासभेच्या मान्यतेनुसार सादर केला असून, अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पदे भरण्याबाबत संबंधीत विभागांना सूचना केल्याने आकृतीबंधानुसार रिक्त जागा भरण्याबाबत सुशिक्षीत व बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!