पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पुन्हा एकदा जोरदार पाऊस

नाशिक (प्रतिनिधी): हिंदी महासागरावर पुढील एक-दोन दिवसात हवेची चक्राकार परिस्थिती निर्माण होऊन हळूहळू ही परिस्थिती उत्तरेकडे सरकत येऊन अरबी समुद्रात आल्यावर ४ ते ६ ऑक्टोंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणात जोरदार पाऊस होईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात देखील जोरदार पाऊसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात ४ ऑक्टोंबरनंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११ ते १२ ऑक्टोंबरपर्यंत हा पाऊस सुरू राहिल, असा अंदाज हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी वर्तविला आहे.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!