लायन्स कल्ब तर्फे पुष्पा लांडगे यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी): वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर नाशिक च्या विद्यमान मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे यांना लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीमच्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका हा पुरस्कार देण्यात आला. प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष यांच्या हस्ते लांडगे यांना पुरस्कार मिळाला. व्यासपीठावर लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष आर. डी पगार तसेच लायन्स क्लबचे सेक्रेटरी प्रमोद अहिरराव, खजिनदार एन.एस पाटील तसेच वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरचे शालेय समिती सदस्य हिरामण(आबा) सोनवणे तसेच सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका माळोदे यांनी केले.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!