पिंपळनारे ग्रामस्थांकडून कृषीदूतांचे स्वागत

कृष्णा पैठणे,

वणी (प्रतिनिधी): महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे कृषिदुतांंचे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम २०२४- २५ च्या अभ्यास दौऱ्या निमित्त पिंपळनारे ग्रामस्थांनी कृषीदूतांचे स्वागत केले.

या अभ्यास दौऱ्या दरम्यान कृषिदूत शेतक-यांना शेतीविषयक शास्त्रीय माहिती, हंगामा प्रमाणे पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी कीटकनाशक आणि सेंद्रिय शेती याबद्दल माहिती देतील. तसेच कालावधी चार महिन्यांचा असून यादरम्यान माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन , पीक संरक्षण याबाबत प्रात्यक्षिक घेतले जातील. अशी माहिती गौरव घडवजे यांनी दिली.
यामध्ये यश हगवणे, गौरव घडवजे, गौरव गव्हाणे, प्रदीप घोलप, शशिकांत जाधव, ओम घाटोळे यांचा समावेश असुन त्यांचे पिंपळनारे गावचे सरपंच निलेश आहेर ,उपसरपंच शालिनी गांगुर्डे , सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्यास विद्यार्थ्यांना क. का. वाघ कृषी महावद्यालयातील प्राचार्य डॉ. एस.एम.हाडोळे कार्यक्रम समन्वयक प्रा. परमेश्वरी पवार , प्रा.जे.वाय.मोटे, प्रा.एच.एन.पाटील व प्रा.डी.आर.पाटील आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील सर्व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!