नाशिकरोड विहितगाव परिसरात आयटी इंजिनिअरची आत्महत्या!

नाशिक (प्रतिनिधी): आयटी इंजिनिअर असलेल्या २३ वर्षीय युवकाने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना विहितगाव परिसरातील सौभाग्यनगर भागात घडली. युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित भाऊसाहेब वाजे (रा. कासार मळा, देवळाली कॅम्प ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रोहितने शनिवारी (दि.२०) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सौभाग्यनगर येथील रेणुका गार्डन शेजारी बांधकाम सुरू असलेल्या अष्टप्रद हाईटज या इमारतीखाली दुचाकी पार्क करून पाचव्या मजल्यावरून झोकून देत आत्महत्या केली. आयटी इंजिनिअर असलेला वाजे पुण्यातील नामांकित कंपनीस नोकरीस होता. आर्टीलरीचे सेंटरचे सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब वाजे यांचा तो एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!