वैतरणा डॅम मध्ये नाशिक शहरातील चार तरुण बुडाल्याची भीती: शोध सुरू

नाशिक (प्रतिनिधी): वैतरणा डॅम येथे फिरण्यास गेलेल्या चार ते पाच तरुणांपैकी चार जण पाण्यात बुडल्याची भीती व्यक्त होत आहे.रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. घोटी पोलिस आणि जीवरक्षक जवान पथक कडून शोध करू सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक रोड, जेलरोड परिसरातील काही तरुण वैतरणा डॅम येथे फिरण्यास गेले होते. यातील दोन तरुण पाण्यात पडले त्यांना वाचवण्या करिता दोघा मित्रांनी पाण्यात उड्या मारत वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र चारही मित्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.यातील एक तरुणाचे नाव आनंद गितीसे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!