कांदा भाव वधारला!

नाशिक (प्रतिनीधी): भारताच्या काही भागात जोरदार पाऊस झालेला असल्याने दक्षिणे भारतातील नवीन कांदा बाजारात दहा ते पंधरा दिवस उशिराने विक्रीस येणार आहे. त्यातच बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात पूर्ववत सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शनिवारी (दि.१०) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या या दिवशीही उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये २०० रुपये प्रतिक्लिंटलने वाढ झाली.

मागील आठवड्यामध्ये उन्हाळ कांद्याचे सरासरी दर हे तीन हजारांच्या आत आले होते. देशामधून कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये अल्पशी वाढ होत कांदा दर पुन्हा सरासरी ३३०० च्या दरम्यान गेल्याने शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये साठवलेला उन्हाळ कांदा हा बदलत्या वातावरणामुळे खराब होत आहे. तसेच शेतकऱ्यांकडील कांदा आता संपत आला आहे. त्यामुळे मिळणारे दर जरी उंच असले तरी मात्र शेतकऱ्यांच्या खूप काही हाती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी ५४९ वाहनांव्दारे कांद्याची ६७३० क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याला कमीत कमी १९५१ जास्तीत जास्त ३३६८ तर सरासरी ३३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विंचूर उप बाजार समितीमध्ये ४२१ वाहनांव्दारे कांद्याची आवक होऊन उन्हाळ कांद्याला कमीत कमी १८०० सतर जास्तीत जास्त ३३९१ रुपये सरासरी ३२७५ प्रतिक्विंचल दर मिळाला. सायखेडा उप बाजार समितीमध्ये १८८ वाहनांद्वारे कांद्याची आवक होऊन उन्हाळ कांद्याला कमीत कमी २४०० तर जास्तीत जास्त ३४०० सरासरी ३३४० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला इतर बाजार समित्या शनिवार असल्याने बंद होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!