सिडकाे (प्रतिनिधी): विभागातील १३२/३३/११ केव्ही अंबड उपकेंद्र येथे तातडीच्या देखभाल-दुरुस्ती कामासाठी शनिवारी (दि. १७) दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसाेय झाली. सायंकाळी ४ वाजेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. सिडकाे विभागातील चेतनानगर, वासननगर, नयनतारा, राजीवनगर, राणेनगर, किशोरनगर, पांडवनगरी, समर्थनगर, शिव कॉलनी, सराफनगर, इंदिरानगर, पार्कसाइड, मेट्रोझोन, आव्हाड मळा, नागरेनगर, सोनवणे मळा, ज्ञानेश्वरनगर, श्रद्धा विहार, श्रद्धा गार्डन, सदिच्छानगर, सिमेन्स कॉलनी आदी भागात शनिवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला हाेता. सकाळी १०.३० ते ११ वाजेपासून विविध भागात वीजपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे नागरिकांची गैरसाेय झाली. गेल्या दाेन दिवसांपासून उकाडा वाढल्याने नागरिकांना दुपारी विजेअभावी असह्य उकाड्याला सामाेरे जावे लागल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. सायंकाळी काही भागात ४, तर अन्य भागात ४.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
पूर्वसूचनेचे संदेश दिले
अंबड उपकेंद्र येथे तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला हाेता. याबाबत नागरिकांना संदेशांद्वारे पूर्वसूचना दिली गेली. वेळेत काम पूर्ण केल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
– मनाेज कातकाडे, सहाय्यक अभियंता, राणेनगर कक्ष
