जिल्हा परिषदेचे २३९ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

आता तालुकांतर्गत विनंती बदली
या प्रक्रियेनंतर आता पुढील टप्प्यात तालुकांतर्गत शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या ७८ शिक्षकांनाही पदस्थापना दिल्यानंतर, रिक्त जागी आंतरजिल्हा बदली शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे नितीन बच्छाव यांनी सांगितले.
नाशिक (प्रतिनीधी): जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक शिक्षण विभागांतर्गत रखडलेल्या मुख्याध्यापक पदोन्नत्यांना अखेर मुहूर्त लागला असून, शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यातील २३९ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. यात तीन दिव्यांग शिक्षकांचाही समावेश आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या उपस्थितीत मविप्र’ संस्थेच्या होरायझन शाळेत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उप शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, धनंजय कोळी, नीलेश पाटोळे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी २८१ शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सर्व शिक्षकांना पदोन्नतीसाठी पाचारण करण्यात आले होते. यातील २३९ शिक्षकांनी मुख्याध्यापकपदी पदोन्नती स्वीकारली असून, ४२ शिक्षकांनी नकार दिला आहे. प्रत्येक तालुक्यात पदोन्नतीनंतर ७५ टक्के शिक्षक कार्यरत राहतील. या प्रमाणात पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपासून मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. याबाबत आ. सत्यजित तांबे यांच्या बैठकीतही हा विषय उपस्थित झाला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने लागलीच प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!