नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक मनपा क्षेत्र वगळता मविप्रच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, एचएसव्हीसीसाठी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी दुसºया प्रवेश फेरींतर्गत सोमवार दि. २४ जूनपर्यंत आनलाईन मेरिट फॉर्म प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आनलाईन मेरीट फॉर्मची पडताळणी, दुरुस्ती व जमा करण्यासाठी दि. २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणा-या ज्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर मेरीट फॉर्म विहित मुदतीत भरलेला नसेल, अशा विद्यार्थ्यांना संस्थेने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांनी मविप्र संस्थेच्या हव्या असलेल्या विविध कनिष्ठ महाविद्यालयांच्या (नाशिक मनपा क्षेत्र वगळता) नावाने मेरिट फॉर्म भरावयाचा आहे. मेरिट फॉर्म पडताळणी व जमा करण्यासाठी संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयांना भेट द्यावी लागणार आहे. जवळच्या मविप्र कनिष्ठ महाविद्यालयांत (नाशिक मनपा क्षेत्र वगळता) मेरिट फॉर्म भरतानाचे मार्गदर्शन व फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

