जि.प.चा २०२४मध्ये सुपर १०० चा उपक्रम!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सन २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षांसाठी निवास स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले. सलग दोन वर्षांच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थी हे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांचा या यशानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच या वर्षापासून ५० ऐवजी १०० विद्यार्थ्यांची आता निवड करावी, असे आदेश दिले.
सुपर ५० उपक्रम २०२२ च्या बॅचची नुकतीच सांगता झाली. या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दिली होती. यातील अश्विनी बोरसे (अकफ ९६८), डिंपल बागूल (अकफ १०१०), हर्षदा वाटणे(अकफ २२६३), आकांक्षा शेजवळ (अकफ २९९३), मंगेश इमपाळ(अकफ ३०४२), सागर जाधव(अकफ ३०४७), वृषाली वाघमारे (अकफ ६१८९) या विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यावेळी खा. शोभा बच्छाव, खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे, आ. सीमा हिरे, आ. माणिकराव कोकाटे, आ. राहुल आहेर, आ. नितीन पवार, आ. हिरामण खोसकर, तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!