- लहांगे यांच्या पाठीशी राहण्याचा गावकऱ्यांचा निर्णय
प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल मतदारसंघांमध्ये उमेदवारी करण्यासाठी वाडीवऱ्हेचे माजी सरपंच तथा इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे यांचे इच्छुक उमेदवार म्हणुन नाव घेतले जात आहे. त्यांच्या वाडीवर्हे गावी लहांगे यांना पाठींबा दर्शवण्यासाठी विशेष बैठकीचे संपन्न झाली.
लहांगे यांनी मतदारसंघातील खेडोपाडी गावोगावी बैठका सुरू केल्या आहे. व त्यातून त्यांना मतदारसंघातील नागरिकांचाही चांगलाच पाठिंबा देखील मिळत आहे.
आज इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी गोपाळा लहांगे यांच्यासाठी वाडीवऱ्हे येथे बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावच्यावतीने नागरिकांनी बोलताना सांगितले की वाडीवऱ्हेसारख्या मोठ्या गावातून गोपाळा लहांगे यांनी उमेदवारी केल्यास वाडीवऱ्हे गाव आणि परिसराचा संपूर्ण पाठिंबा गोपाळा लहांगे यांना असेल. सर्व ग्रामस्थ गोपाळा लहांगे यांच्या सोबत राहतील अशी ग्वाही या बैठकीत ग्रामस्थांनी दिली.
यावेळी बोलतांना गोपाळा लहांगे यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे.त्यासाठी सर्व गावकरी एकदिलाने,आणि एक विचाराने एकत्र आले आहे.त्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळालं आहे.मी तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
