इगतपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने मेंगाळ यांच्या उमेदवारीसाठी एकमुखी ठराव!

घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी त्यांच्या कार्यकाळात भरीव विकासकामे केली होती त्याच प्रमाणे जिल्हा परिषद मध्ये सभापती असताना देखील मोठ्या प्रमाणात विकास कामांचा आलेख त्यांच्या कार्यकाळात झालेला आहे आज इगतपुरी शिवसेनेच्या वतीने घोटी येथे भव्य मेळावा घेण्यात आला होता त्याप्रसंगी सर्व शिवसैनिकांनी काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी जाहीर करा असं एकमुखी ठरवून ठरवण्यात आला होता आणि शिवसेनेच्या वतीने तेच उमेदवार राहतील माजी आमदार पांडुरंग गांगड यांनी व्यक्त केला. यावेळी ते पुढे म्हणाले की इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघांमध्ये आत्तापर्यंत परक्या लोकांनीच उमेदवारी करून आमदारकी लढवली आहे आज खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून सर्व ठाकूर समाजवादी विषय समाज हा काशिनाथ मेंगाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची स्थानिकच आमदार जिंकणार आणि त्याला पूर्णपणे आमचा पाठिंबा असणार असे प्रतिपादन माजी आमदार पांडुरंग गांगड यांनी व्यक्त केले.

यावेळी लाडकी बहीण योजने चे तालुकाध्यक्ष संपत काळे यांनी बोलताना सांगितले की इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकास कामे बघायचे असेल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रोख ठोक निर्णय घेण्याची ताकद आज एकमेव या नेत्यात आहे लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज बिल मोफत असे अनेक मोठे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहे त्यामुळे मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तसेच इगतपुरी तालुका शिवसेना ही माजी आमदार मेंगाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे मत संपत काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदर मेंगाळ यांनी केले यावेळी ते म्हणाले की इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात मी गेली अनेक वर्ष काम करत असून विविध स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचे विकासकामे केली आहे त्यामुळे मतदार संघात जर पुन्हा स्थानिक म्हणून मला संधी द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर देवीदास जाधव, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे, शिवसेनेचे तालुका संघटक जयराम गव्हाणे, विधानसभा सपंर्क प्रमुख पुंडलिक जमधाडे, खंडू धांडे, ज्ञानेश्वर जमधाडे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!