आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त गोकुळ जाधव यांचा शेतकऱ्यांना सल्ला!
लक्ष्मण सोनवणे,
बेलगाव कुऱ्हे (प्रतिनिधी): आपली भारतीय मातृभूमी सृजलांम सुफलंम असे आपण म्हणतो सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत खडकाळ, मुरमाट व तांबडी माती आहे त्या त्याभागात नैसर्गीक परिस्थिती नुसार पिके घेतली जातात. त्याच डोंगरातून निर्माण झालेल्या नदी नाले हे पुढे एक होऊन गोदावरी, भीमा, चंद्रभागा, कृष्णा या नद्या वाहत जाऊन समुद्राला मिळाल्या आहेत त्या भागाकडे जमीन काळी कसदार जमीन पहावयास मिळते. आज आधुनिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते.
शेतीत भरघोस पिके घेतली जातात मात्र माणसाला शारीरिक दृष्ट्रीने घातक आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य तपासून माती परीक्षण करणे गरजेचे आहे जासीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय, कंपोस्ट खतांचा वापर करावा शेतकरी बांधवांनी मनाशी निर्धार करून संकल्पना करावी असे आवाहन कृषी पदवीधर तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेनीतचे युवा शेतकरी गोकुळ जाधव यांनी केले. इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत जमिनीची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याचे दिसते. तालुक्यात बहुतेक शेतकरी जमिनीचे मातीपरिक्षण करून वाटचाल करताना दिसत आहे. यासाठी शासनानेही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यानी तणनाशकची फवारणी करू नये जेणेकरून शेतीमध्ये शेतकऱ्यांचा मित्र असलेला गांडूळ, सरपटणारे प्राणी शेतामध्ये मरण पावतात त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते पिकांना पोषक वातावरण मिळत नाही. म्हणून बळीराजाने जैविक खतांचा उपयोग करावा त्याबरोबरच शेतीत आंतरपिके घेतल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते असे गोकुळ जाधव यांनी सांगितले.
