कृष्णा पैठणे,
वणी (प्रतिनिधी): वणी येथील राधाकृष्ण मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्त विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.
पण येथील भगवती नगर येथे राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुक्रवार दि. २३ ते सोमवार दि. २६ दरम्याण भव्य त्रिदिनी किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान ह.भ.प. महेश महाराज यांनी संगीतमय श्रीकृष्ण कथेचे निरुपण केले. आज मंगळवार दि. २७ रोजी काल्याचे किर्तन व त्यानंतर दहीहंडी कार्यक्रम होऊन महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधाकृष्ण महिला मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ व शनैश्वर मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.