नाशिकला ५० इ-बसेससाठी आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळण्याचा उशिर!

नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत १०० बसेस घेण्याकरता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र हा प्रस्ताव वेळीच पूर्ण होऊ न शकल्याने हा प्रस्ताव बारगळला. त्याचवेळी केंद्र शासनाच्या पीएम इ-बसेसची योजना आल्याने महापालिकेला या योजनेच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यात ५० बसेस उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाच्या पीएम इ-बस योजनेच्या माध्यमातून नाशिक शहरासाठी ५० इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील सर्वच प्रक्रिया पूर्ण होऊन बसेस पुरविणा-या संबंधीत कंपनीशी करार होणे तेवढे बाकी आहे. कराराबाबतही सर्वच प्रक्रिया पूर्ण आहे, मात्र करारावर स्वाक्षरी तसेच त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्तच नसल्याने कराराची फाइल पडून आहे.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815
केंद्र शासनाने नाशिकसह महाराष्ट्रातील अन्य शहरांसाठी बसेस पुरविण्याकरता जेबीएम इ मोबिलिटी या कंपनीची नियुक्ती केली असून, ही कंपनी महाराष्ट्रातील विविध शहरांना सुमारे ३६०० बसेस पुरविणार आहे. नाशिक महापालिकेने संबंधीत कंपनीमार्फत बसेस मिळविण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, महापालिका आणि जेबीएम इ मोबिलिटी कंपनीबरोबर करार व्हायचा बाकी आहे. त्याबाबतची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त प्रदीर्घ रजेवर असल्याने करारनामा मार्गी लागू शकलेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच करारनामा मार्गी लावून कार्यारंभ आदेश देण्याची मनपाची तयारी आहे. मात्र करारनामा होत नसल्याने पुढील प्रक्रिया देखील थांबली आहे. करारनाम्यास आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाल्यास ५० इ बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता आयुक्त २ सप्टेंबर रोजी मनपा सेवेत रूजू झाल्यास करारनाम्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. असे झाल्यास कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे.
जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!