‘जायकवाडी’ पाणीवाटपाचा गुंता सुटला: जलसाठा ८५ टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नसल्यास आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा नसल्यास मराठवाड्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यास विरोध होतो. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात मुळातच पाऊस कमी झाला होता. त्यामुळे पाणी सोडण्यास विरोध झाला होता, तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. दरम्यान, यानंतरही पाणी सोडण्यास स्थगिती न मिळाल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी-दारणा, पालखेड समूहातील २२ धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागले होते.
नाशिक (प्रतिनिधी) : समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी न भरल्यास गोदावरी खोºयातील नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे लागते. पण, यंदा ऑगस्ट अखेरच जायकवाडीचा जलसाठा ८५ टक्के झाला आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाचा गुंता सुटला असून, नाशिक
-अहमदनगरकरांवरील जलसकंट टळले आहे.
यंदाच्या हंगामात १ जून ते ३१ ऑगस्टअखेर नाशिकमधून ३४ हजार सहा दशलक्ष घनफूट म्हणजेच ३४ टीएमसी आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून २१ हजार ६०० दशलक्ष घनफूट म्हणजेच २१.६ टीएमसी असा एकूण ५५.६ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून संघर्ष होत असून, गेल्या वर्षी नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र, आता नाशिक आणि अहमदनगरमध्ये चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणासाठी विसर्ग झाला असून, आता हे धरण ८५ टक्के भरले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे ऐन उन्हाळ्यात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही. २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने समन्यायी पाणी वाटपाचे धोरण अवलंबल्याने नाशिक आणि नगरमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागते. या आधी नाशिकमधून अहमदनगर येथे पाणी सोडण्यावरून वाद होता. मात्र, मेंढगिरी समितीचा अहवाल आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जायकवाडी धरणाचा साठा ६५ टक्के न झाल्यास वरील भागातून म्हणजेच नाशिक आणि अहमदनगर या धरणे असलेल्या भागातून पाणी सोडावे लागते. त्यामुळे आता नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष उभा राहतो.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!