नाशिक शहरात आत्महत्याकरत पाच जणांनी घेतला गळफास, दोघांनी रेल्वेखाली उडी!

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागात राहणा-या सात जणांनी आत्महत्या केली. त्यात पाच जणांनी गळफास घेत, तर दोघा अनोळखींनी रेल्वेखाली झोकून देत आपले जीवन संपविले. आत्महत्या करणा-यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृत व्यक्तींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांत मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील दामोधर चौकात राहणा-या विनोद मोतीलाल महाले (वय २९, मूळ रा. सैताणे, जि. नंदुरबार, हल्ली मु. मोंढे चाळ, दामोधर चौक) या युवकाने सोमवारी (दि. १६) अज्ञात कारणातून आपल्या राहात्या घरात लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत भरत मोंढे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. दुसरी घटना सातपूर येथील एमएचबी कॉलनीत घडली. चेतन भाऊसाहेब चव्हाण (वय २५) या युवकाने सोमवारी (दि. १६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लाकडी आढ्याला दोरी बांधून गळफास घेतला होता. रूम पार्टनर ज्ञानेश्वर पवार रात्री कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. परिसरातील नागरिकांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार सूर्यवंशी करीत आहेत. तिसरी घटना गंजमाळ भागात घडली. स्वाती शाम चव्हाण (वय २३, रा. म्हाडा बिल्डिंग, सहकारनगर) या महिलेने मंगळवारी (दि.१७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास स्कार्प बांधून गळफास घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार म्हसदे करीत आहेत. चौथी घटना औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. वर्षा शाम कटरमल (वय ३०, रा. संविधान चौक, चुंचाळे शिवार) या महिलेने मंगळवारी (दि.१७) अज्ञात कारणातून हॉलमधील पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास घेतला होता. बेशुद्धावस्थेत दीर राम कटरमल यांनी तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत. नवनाथ विजय गायकवाड (वय ३८, रा. म्हाडा बिल्डिंग, कृष्णनगर, चेतनानगर) यांनी सोमवारी (दि. १६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेतला होता. सिग्नस हॉस्पिटलमार्फत कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी उपचार सुरू असताना वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!