ग्राहकाने थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करा: पडळकर

नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देणे हे जसे आपले कर्तव्य आहे, तसेच दरमहा १०० टक्के वसूली होणेसुद्धा आवश्यक आहे. वीज देयकांची वसुली वेळेत न भरणाºया थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करावा, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी महावितरणच्या नाशिक व मालेगाव मंडळातील अधिकाºयांना दिल्या.दत्तात्रय पडळकर यांच्याकडे नाशिक परिमंडळाचे पालकत्व देण्यात आलेले आहे. त्यांनी नाशिक व मालेगाव मंडळाची बैठक घेऊन विविध विषयांचा व योजनांचा आढावा घेतला. यावेळी पडळकर म्हणाले की, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना थकबाकी मुक्त होण्यासाठी व नवीन जोडणीसाठी ‘अभय योजना’ आणली आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करावेत.

वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यापेक्षा वीजदेयकांची वसुली होण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच वीज जोडणीसह इतर सेवा ग्राहकांना तत्काळ मिळाव्यात म्हणून प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री सौरघर मोफत वीज योजना, सौर ग्राम योजना, मागेल त्याला सौर पंप, या सर्व योजनांचा पडळकर यांनी आढावा घेतला. ग्राहकांना वेळेत सेवा न दिल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला. मार्चअखेर परिमंडळात सवार्नी वीजदेयकाची शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करून आणखी गतिमानतेने व उत्कृष्ठ कार्य करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले. बैठकीला नाशिक व मालेगाव मंडळातील अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!