अंकुश निकम,
नाशिक (प्रतिनिधी): महात्मा नगर येथील पंड्या हॉस्पिटल मध्ये नाशिक म. न. पा. आरोग्य विभाग व अन्न औषधं प्रशासन गंगापूर पोलीसांच्या मदतीने धाड टाकून गर्भपात करण्यासाठी वापरात येणाऱ्या बंदी असलेल्या बेकायदेशीर औषधसाठा जप्त करण्याची कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आर. न. पंडया यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांनी सांगितले.
या संयुक्त कारवाईत म.न. पा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण आणी कर्मचारी अधिकारी तसेच अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुरेश देशमुख, प्रवीण हारक सहभागी होते.
तपासणी मोहीम अन्य हॉस्पिटल वर ही करावी. शहरातील बरेच डॉक्टर बेकायदेशीर औषध साठा जवळ ठेवत असुन त्यांची वेळोवेळी तपासणी करावी.अशी मागणी रिटेल फार्मासिस्ट चे अध्यक्ष धनंजय खडगीर यांनी केली आहे. कारवाई चे स्वागत शहरातील सर्व फार्मासिस्ट ने केले असुन बेकादेशीर औषध कोण पुरवतो याचा शोध ही घेणे गरजेचे आहे.