बॅनर फाडले म्हणून वाहनांची काच फोडत दहशत; अंबड पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनीधी): मागील भांडणाची कुरापत काढून तसेच नवरात्रीच्या शुभेच्छाचे बॅनर फाडले म्हणून कारची काच फोडल्याचा प्रकार सिडकोतील बाजीप्रभू चौक येथे घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नवरात्रीत शुभेच्छा देण्यासाठी संदीप दोंदे यांनी बॅनर लावले होते. ते फाडण्यात आल्याचा आरोप करीत त्यांच्या भावाने गणेश पाटील यांच्या कारची काच फोडली. यासंदर्भात अंबड पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!