शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी

आकाश साळुंके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी): तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून परतीचा पाऊस मोठ्य प्रमाणावर झाल्यामुळे  जिरायती पिकांसह फळबाग व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन पीकविमा मंजूर करावा अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष आकाश साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून काही नागरिकांची घरे पडली आहेत. शेतीपूरक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत काही घरांवर विज पडून घरांचे मोठें नुकसान झाले आहे म्हणुन अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट नुकसान ग्राह्य धरून तातडीने पीकविमा मंजूर करण्यात यावा तसेच मका व जिरायती पिकांना हेक्टरी एक लाख रुपये, फळबागेला हेक्टरी दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळावी  ज्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्यात यावे, फळबागा, भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या हंगामात सुरुवातीस पावसाचा पडलेला खंड, त्यानंतर आलेली अतिवृष्टी आणि रोगांच्या साथी, किडीचा प्रादुर्भाव यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र आधिच बाधीत झाले असतांना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झालेले आहे. या संपूर्ण नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा असे साळूंके यांनी निवेदनात म्हटले आहे.

“सर्वत्र नुकसानीची नजर पाहणी करून पंचनामे करण्यात यावे कोणालाही वंचित न ठेवता  शासन स्तरावर तात्काळ आवश्यक ते निर्णय घेऊन आदेश निर्गमित करावेत तसेच कोणत्याही तांत्रिक कारणामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जावी. शेतातील हाता-तोंडाला आलेले पीक गेल्यामुळे हतबल शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी”

आकाश साळुंके, तालुकाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!