नाशिक (प्रतिनीधी) : बंगल्याच्या आवारातून तस्करांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार चेतनानगर भागात घडला. न्यायाधीशांच्याच बंगल्याच्या आवारात अज्ञात पुष्पा आला व चंदनाचे झाड कापून गेला. या घटनेत सुमारे २० ते २२ वर्ष जुने झाड भामट्यांनी चोरून नेले असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय अच्युत देशपांडे (रा. पवमान बंगला, चेतनानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि.१२) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात बेकायदा प्रवेश करून चंदनाचे झाड कापून नेले. याप्रकरणी हवालदार गारले तपास करीत आहेत.
न्यायाधीशांच्याच बंगल्याच्या आवारात पुष्पा आला व चंदनाचे झाड कापून गेला
