प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील सागर गंगाराम राव (वय ३०) या युवकावर जनावरे चारत असताना वीज पडून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असुन त्याला तात्काळ वाडीवऱ्हे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज मंगळवार दुपारी साडे तीन ते चार वाजे दरम्यान मुकणे येथील सागर गंगाराम राव हा युवक मुकणे-पाडळी देशमुख शिवारात जनावरे चारत असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली मात्र जवळ लपण्यासाठी जागाही नसल्याने सागर हा जनावरांजवळच असताना जोरात वीज कडाडली व सागर राव या युवकावर पडली यात सागरचे कपडे व केस जळाले असुन पायालाही गंभीर जखमा झाल्या, यात सागर गंभीररित्या भाजला आहे. घटनेचे वृत्त समजताच पाडळी फाट्यावरील युवकांनी धाव घेत सागरला गाडीत घेऊन तात्काळ वाडीवऱ्हे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असुन सागरवर उपचार सुरू आहेत.
