शंभर, दोनशेचा स्टॅम्प झाले इतिहासजमा!

आजपासून कोणत्याही व्यवहारासाठी लागणार 500 चाच स्टॅम्प!

जगदिश वाघ,

नाशिक: आज 16 ऑक्टोबरपासून शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशे रुपयांचाच मुद्रांकवर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद केल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणार आहे.

सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे 100 रुपयांच्या स्टॅम्पवरती केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी 400 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठी 200 रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठीसुद्धा आता 500 रुपये मोजावे लागणार आहेत.

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!