नाशिक (प्रतिनिधी): दत्त चौक सिडको येथे पत्रकारास मारहाण झाली अवैध धंदे सुरू असताना पत्रकाराने आवाज उठवला यावर पत्रकारांवर दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यात पकडून मारहाण करण्याचे प्रकार नाशकात सुरू झाल्याने पत्रकारांवर जिव घेणे हल्ले होण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यावर नाशकात पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल काशीनाथ शेळके वय ३८ वर्षे रा. मल्हारखान झोपडपट्टी गंगापुर रोड, नाशिक, रमजान राजु शेख, वय २५ वर्ष, अजमेरी मस्जिद रा. शिवाजी चीक, भद्रकाली, जुने नाशिक. दिनांक १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी दुपारी ०१:०० वा.चे सुमारास साईप्रसाद पाटील हे रहात्या घरातुन निघत विजयनगर कडुन चांडक सर्कलकडे जात असताना दत्त चौक, सिडको येथिल महावितरण कार्यालय सिडको नाशिक येथे रोडवर आले असता तेथे १) राहुल काशीनाथ शेळके वय ३८ वर्षे २) रमजान राजु शेख वय २५ वर्षे असे दोघे माझे जवळ येवुन त्यापैकी रमजान राजु शेख याने माझी कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली पाडत मारहान करत धमकी दिली खिशामध्ये जे काही पैसे व मोबाईल फोन असेल ते गुपचुप काढुन दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे बोलुन त्यांच्या पॅन्टचे उजव्या बाजुचे पाठीमागील खिशात असलेले २००/- रूपये दराची नोट बळजबरीने काढून घेतली. तसेच हातामध्ये असलेला माझा त्यांचा व्हिओ कंपनीचा मोबाईल फोन त्यांनी बळजबरीने काढून घेवुन जिवे मारण्याचा दम दिला. राहुल काशीनाथ शेळके वय ३८ वर्षे ग. मल्हारखान झोपडपट्टी गंगापुर रोड नाशिक, रमजान राजु शेख, वय २५ वर्ष, अजमेरी मस्जिद शिवाजी चीक भद्रकाली जुने नाशिक. यांच्या विरोधात गु. र. नं. 208/2025 BNS कलम 311, 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंबड पोलीस स्टेशनचे सह पो.नि किरण रौंदळे बघत आहे.
