अंबड (प्रतिनिधी): कामटवाडा पश्चिम येथील इंद्रनगरी परिसरात भरदिवसा सकाळी 11:00वा. च्या सुमारास सुनिल इंगळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर कोयता मारत दहशत माजविण्याचा प्रयत्न चारजणांच्या टोळक्याने केला. नागरिकांनी त्यांच्या पैकी एकाला धरून ठेवले, त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले असता पोलिसांचा चोप मिळताच इतर साथीदार कुठले होते त्याने सांगितले.
तसेच एकदिवस आगोदर येथील परिसरातच काही टोळक्याने बिल्डिंगखाली उभ्या असलेल्या चारचाकीवर मोठा दगड टाकत वाहनाचे नुकसान केले आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाजनक वातावरण निर्माण झाले असून अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास अंबड पोलिस करत आहे.
