जयंत पाटील म्हणतात पोलीस वाहनात बसलेल्याचे एन्काउंटर करायची गरज काय?

नाशिक (प्रतिनिधी): बदलापूर घटनेतील संशयित अक्षय शिंदे याने पोलिसांची पिस्तूल काढली आणि स्वत:चा शेवट करून घेतला, असे आधी सांगितले गेले, त्यानंतर, पोलिसांनी त्याचे एन्काउंटर केल्याचे सांगण्यात आले. पोलीस वाहनात बसलेल्या माणसाचे एन्काउंटर करायची गरज काय, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे, यात कोणाचेही दुमत नाही. मात्र, संबंधित संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पालक पोलिसांकडे गेल्यानंतर गुन्हा नोंदवायला उशीर केला. याबाबत त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गैरसमज पसरविणे चुकीचे शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर बोलताना, कोण कोणाच्या जवळ आहे, याबाबत कसेही निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करून देणे चुकीचे असल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केला. आंबेडकरांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचे आंदोलन करीत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!