मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या आत मोबाइल नेता येणार नाही, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे. मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष असणार आहे. तेथे बीएलओ उपस्थित राहून मतदारांना मतदारयादी भागातील मतदाराचा अनुक्रमांक शोधून देण्यासाठी मदत करतील. याशिवाय व्होटर हेल्पलाइन अॅपद्वारे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, मतदारयादी भागातील अनुक्रमांक माहीत करून घेता येईल. मतदान मेंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, माहितीदर्शक फलक, टॉयलेट, व्हीलचेअर, पाळणाघर, स्वयंसेवक आदी सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत.
Related Posts
नाशिकच्या उमेदवारांसाठी पोलिस व्हेरिफिकेशन बाजूला, आधी ‘शौचालय टेस्ट’!
नाशिक महापालिकेचा अजब फतवा; उमेदवारांची धावपळ, कार्यालयांत गोंधळ प्रतिनिधी | नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे…
आरटीई प्रवेश प्रक्रिया ही आँनलाईन असल्याने पालकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये!
‘आरटीई’विषयी खोटी माहिती दिल्यास होणार कारवाई नाशिक (प्रतिनिधी): शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी एजंटच्या भूलथापांना अनेक पालक बळी पडत असल्याचे…
आनलाईन छायाचित्र आवश्यक केल्याने दाखले मिळविण्यासाठी धडपडणा-या विद्यार्थ्यांसह पालकांची होतेय गैरसोय!
नाशिक (प्रतिनिधी): दाखल्यांसाठी प्रत्यक्ष छायाचित्र आवश्यक असून त्याशिवाय सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे यंत्रणेकडून सुचित करण्यात आले आहे.…
