१.२१ लाख नवमतदार
जिल्ह्यात १८ व १९ वयोगटातील एक लाख २१ हजार १०८ मतदारांची नोंदणी झाली असून, हे सर्व नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसे जिल्ह्यात ८० वर्षांहून अधिक एक लाख २३ हजार ५३२ ज्येष्ठ मतदार आहेत.
मतदान केंद्रांवर सुविधा
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाकडून जिल्ह्यातील मतदान केंद्रावर विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. केंद्रात मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, पिण्याचे पाणी, सावलीकरिता व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प, ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असेल. तसेच, महत्त्वाच्या केंद्रांवर पाळणाघराची व्यवस्था असणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी केंद्राच्या परिसरात स्वयंंसेवक तैनात केले जातील. वैद्यकीय पथकही तैनात करण्यात येणार आहे.
गृह मतदान पूर्ण
जिल्ह्यात ८५ वर्षांवरील दोन हजार ४४९ ज्येष्ठ, तसेच दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली होती. गेल्या आठवड्यात पंधराही मतदारसंघनिहाय नियुक्त पथकांनी नोंदणी केलेल्या या सर्व मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले. जिल्ह्यात आठ हजार ७९६ सैनिक मतदार असून, त्यांच्यापर्यंत यापूर्वीच ईटीपीबीएमएस प्रणालीद्वारे मतपत्रिका पोहोच करण्यात आल्या आहेत. सैनिक मतदारांच्या मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ च्या आत त्या-त्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे स्वीकारल्या जाणार आहेत.
पुरुष : २६ लाख १४ हजार ९६
महिला : २४ लाख ४६ हजार ८६८
तृतीयपंथी : १२१
जिल्ह्यासाठी लागणारे ईव्हीएम
बॅलेट युनिट्स : १२०३९
कंट्रोल युनिट्स : ६२४७
व्हीव्हीपॅट : ६७३९
मतदारसंघनिहाय माहिती:
मतदारसंघत उमेदवार मतदान केंद्रे
नांदगाव १४ ३४१
मालेगाव मध्य १३ ३४४
मालेगाव बाह्य १७ ३५४
बागलाण १७ ३८९
कळवण ०७ ३४८
चांदवड १४ ३०६
येवला १३ ३२८
सिन्नर १२ ३३८
निफाड ०९ २७८
दिंडोरी १३ ३७३
नाशिक पूर्व १३ ३३१
नाशिक मध्य १० ३०४
नाशिक पश्चिम १५ ४१३
देवळाली १२ २७९
इगतपुरी १७ ३००
एकूण १९६ ४९२६