इगतपुरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी बाळासाहेब झोले यांनाच द्या!

विकास शेंडगे,

घोटी (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा लक्षात घेता इगतपुरी तालुक्यामध्ये इच्छुकांनी आतापासूनच आपल्या गटामध्ये मतदार संघामध्ये दौरे सुरू केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे केलेली आहे. यामध्ये अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शिवराम झोले यांचे ज्येष्ठ चिरंजीव बाळासाहेब झोले यांना देखील उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी खंबाळे येथे झालेल्या बैठकीत ही मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसधुणे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीमध्ये एकत्र तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो समर्थक आणि देखील उपस्थित लावली होती इगतपुरी विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीव असून या मतदारसंघांमध्ये माजी आमदार शिवराम घुले यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहे त्यांचा वारसा म्हणून आज बाळासाहेब झाले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये काम करत असून त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली आहे. युवा चेहरा म्हणून बाळासाहेब झोले यांची ओळख असून तरुणांचा देखील त्यांना वाढत्या प्रमाणात मोठा प्रतिसाद आहे त्यामुळे त्यांना जर उमेदवारी दिली तर नक्कीच विजय होतील असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी बाळासाहेब झोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, मला जर पक्षाने संधी दिली तर तालुक्यातील विविध चे प्रश्न असतील समस्या असतील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असेल तो मी निश्चितपणे सोडविल आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!