घोटी (प्रतिनिधी): उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना, तालुका इगतपुरी यांच्यावतीने तालुका स्तरीय महाअधिवेशन शुक्रवार दि. ०४ ऑक्टोंबर रोजी राजाराम साळवी मंगल कार्यालय, घोटी बुद्रूक येथे भरविण्यात आले. उमेद अभियानाच्या हजारो महिलांचे प्रश्न मार्गी लावन्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार, सर्व पक्षिय लोक प्रतिनिधी यांची ग्वाही घोटी, ता. इगतपुरी येथे उमेदच्या वतीने हजारो महिलांचा मेळाव्यात एल्गार तसेच यावेळी उमेदच्या हजारो महिलांनी आज हजारो संख्येने उपस्थिती लावली असून शासनाकडे उमेद अभियान कायम करून स्वतंत्र विभाग निर्माण करण्याचे व आस्थापनेवर सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी व सर्व समूह संसाधन व्यक्ती महिलांना कायम करनेबाबत मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वेळोवेळी दिले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर दि. १०, ११, व १२ जुलै २०२४ भर पावसात लाखोंच्या संखेने राज्य संघटनेच्या वतीने तीन दिवसीय आंदोलन केले होते. मा मुख्यमंत्रींनी मागण्यापूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महा मेळावा आयोजित करण्यात आला आणि महिलांनी हजारोंच्या संखेने उपस्थित राहून आपली टाकत दाखवत शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत उमेद अभियान आपले उमेदवार उभे करून निवडून आणतील व आपले सरकार बनवतील असे प्रतिपादन महिलांनी केले.
आमदार हिरामन खोसकर यांच्या माध्यमातून शासनकडे उमेदच्या सर्व मागण्या पूर्ण कशा होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते जनार्दन माळी यांनी व्यक्त केले. पंचायत समिती माजी सभापती मा सोमनाथ जोशी यांनी उमेद अभियान कायम करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आणि महिलांसोबत सतत उभे राहण्याचे सांगितले. माजी आमदार मा पांडुरंग गांगड यांनी महिला महा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या व सर्व परीने उमेद सोबत उभे राहू व उमेद अभियानचा वेगळा विभाग करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचे नमूद केले.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियाना स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून स्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यात यावे हि मुख्य मागणी उपस्थित सर्व पक्षिय लोक प्रतिनिधी यांनी . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन माळी हे होते. प्रमुख पाहुणे वामन खोसकर, रघुनाथ तोकडे, पांडुरंग मामा शिंदे, संपत काळे, तालुका व्यवस्थापक दिपाली वाघ, गणेश भुसे, तालुकाध्यक्ष भारती नाठे हे विचारपिठावर उपस्थित होते.
यावेळी भगवान आवारी, कैलास भांगरे, रणजीत धाडसे, ऋषिकेश, कैलास शिंदे हे उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी जया लंगडे, सुमन भांगरे, सविता कडाळी, बेबीताई तेलम, आरती अडोळे, मोनाली नाठे व सर्व कॅडर यांनी परिश्रम घेतले.
